या शुष्क या वनात ......
पडलो इथे असा हा,
मी शुष्क या वनात.
बघतो म्रुतवत सारे,
मी शुष्क या वनात.
पाखरे कधी न गाती,
ना मयूर-न्रुत्य झाले,
निशब्द गलित पर्ण,
या शुष्क या वनात.
गाऊन पाहिले मी,
जुळले कधी न सूर,
माझाच सूर मजला,
या शुष्क या वनात.
दिसता रन्ग उषेचा,
कधी मी हाक देतो,
आता तरी उठा हो,
आला प्रकाश आहे.
सरता ही सान्ध्यछाया,
देतो कधी मी हाक,
आता तरी उठा हो,
काळोख दाटलाहे.
येतात कानी माझ्या,
माझेच फक्त शब्द,
पडलो इथे असाहा,
मी शुष्क या वनात.
घेऊन कोम्ब उद्याचे,
जगतो मी आज आहे.
होतील व्रुक्ष तयाचे,
या शुष्क या वनात.
भिडतील ते नभाला,
फुलतील पुष्प सारे,
येतील पाखरे ही,
या शुष्क या वनात.
पाहता स्वप्न उद्याचे,
आले भरुन आहे,
पडतील आज धारा,
या शुष्क या वनात
Labels: या शुष्क या वनात ......