वळवाच्या सरीन्नी,
म्रुद्गन्ध जो दिजला,
वर्षाच्या सरीन्च्या,
धारात मिटुन गेला.
आसमन्ती इन्द्राधनुने,
जे सप्तरन्ग भरले,
पसरता नभी प्रकाशी,
क्षणात सरुन गेले.
जे सप्तरन्ग भरले,
पसरता नभी प्रकाशी,
क्षणात सरुन गेले.
मायेच्या सावल्याही,
काळानुरुप सरल्या,
निस्प्रुह प्रीतीच्या ही,
खूणाच फक्त उरल्या.
मज स्वप्नस्रुष्टी चे हे,
महाल सर्व झडले,
दु:खासहीत काही,
मनात प्रश्न उरले.
मनात प्रश्न उरले.
मज जीवन दीनाच्या,
मध्यान्ही असा हा,
मज स्वप्न जीवनाचा,
सुर्यास्त का दिसावा?
मज साद घालणारया,
सुह्रुदान्चे हे तराणे,
होते खरेच का ते,
सारेच हे बहाणे?
सारेच हे बहाणे?
हळव्या मनान्च्या या,
अव्यक्त बन्धनान्च्या,
निशब्द भावनाना,
निशब्द भावनाना,
तो अर्थ काय होता?
नात्यान्चे अन मनान्चे,
हे सप्तसुर जुळले,
मग रन्ग मैफीलीचे,
बेसुर का निघाले?
मिटातील रन्ग सारे,
सुटतील सन्ग सारे,
वनवास का मनाचा,
प्रवाह हाच आहे?
Labels: मनाचा प्रवाह
0 Comments:
Post a Comment
<< Home