Wednesday, December 05, 2007

मी एक गलीत पर्ण....

सान्डून रन्ग सारे, भूमीवरी मी पडलो,
सोडून व्रुक्ष सारे, वारया सवेत फिरालो.

आसमन्ती सान्ध्यछाया, पाहून मूक झालो.
कधी मी चान्दण्याला, चाखून त्रुप्त झालो.

तारुण्य-सौन्दर्याच्या, युगुलात कधी मुरडलो,
कधी मी बालकान्च्या क्रिडान्मध्ये ही रमलो.

कधी मी बारशान्चे, ऐकुन गीत हसलो,
राखेत मर्तिकाच्या लोळून ही मी रडलो.

उत्तुन्ग वैभवाच्या महलावरी मी चढलो,
भग्न मन्दीरान्च्या, चरणी नमून गेलो.

आसक्त तुम्बलेल्या, डबक्यात कधी बुडालो,
सखोल शास्वताच्या पाण्यावरी मी तरलो.

पाहुन चित्र सारी, थोडासा स्तब्ध झालो,
आलो इथे कशाला, उमगून आज गेलो.

Labels:

0 Comments:

Post a Comment

<< Home